Widgets Magazine
Widgets Magazine

900 किलो टोमॅटो चोरी करणारा जेरबंद

tomato bank
मुंबई- 900 किलो टोमॅटो चोरून खळबळ उडवून देणार्‍या चोराला दहिसर पोलिसांनी अखेर अटक केली आहे. 27 दिवसांच्या तपासानंतर पोलिसांना 54 वर्षीय आरोपीला जेरबंद करण्यात यश मिळाले आहे. पोलिसांनी अटक केलेल्या या आरोपींचे नाव चंद्रशेखर कुर्लामध्ये सामान वाहतूक करण्याचे काम करतो.
Widgets Magazine
चोरीसाठी ज्या टेम्पोचा वापर करण्यात आला, तो साई टेम्पोचा सर्व्हिसचा मालक असलेल्या चंद्रशेखर गुप्ताचाच आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चंद्रशेखर गुप्ताला कुर्लामधून अटक केली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंत पिंगळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, टोमॅटो विक्रेता जगत श्रीवास्तव याने ठाण्यात अविनाश कंपाउंडमधील भाजी मार्केटमधून 57 हजार रूपये किंमतीचे टोमॅटो चोरीला गेल्याची तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजची पाडताळणी केली. यावेळी साई टेम्पो सर्व्हिसचा लिहिलेला एक संशयित टेम्पो त्यांना सीसीटीव्हीत दिसला. याआधारे पोलिसांनी कारवाई करत आरोपीला कुर्लामधून अटक केली आहे.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :