Widgets Magazine
Widgets Magazine

राज्यात पर्यटकांचा मृत्यू

सोमवार, 24 जुलै 2017 (11:22 IST)

water fall

गटारीनिमित्त मजामस्ती आणि पावसाळ्याचा आनंद लुटताना राज्यभरातील सात पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यात कसारा, नेरळ, कर्जत, वाशिंद आणि अलिबागमध्ये धबधब्यांवर बुडून सात पर्यटकांचा मृत्यू झाला आहे.

कसाऱ्याजवळ अशोका धबधब्यात पाय घसरुन बाळासाहेब गोडसे हा तरुण तीनशे फूट उंचावरुन कोसळला. नेरळ येथील आनंदवाडी धबधब्यात मुलुंड येथील सुरेश चेंचकर याचा बुडून मृत्यू झाला, तर कर्जतच्या पाली भुतवली धरणात बुडून मुंबईच्या पर्यटकाचा मृत्यू झाला.

वासिंद येथे दहागाव जंगलातील नाल्याच्या बंधाऱ्यावर पर्यटनासाठी मुंबई महापालिकेतील 18 कामगार मित्र आले होते. या बंधाऱ्यात संतोष चव्हाण हा कर्मचारी बुडाला. अलिबागमधील चौल येथील रामेश्वर तलावात पोहण्यासाठी उतरलेला मीत कोळवणकर हा पर्यटक बुडाला. कर्जतच्या पेब येथील डोंगरावर ट्रेकिंगसाठी गेलेला कल्याण-मलंगगड येथील अब्दुल नावाचा पर्यटक खोल दरीत कोसळला.जव्हार येथील प्रसिद्ध दाभोसा धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी जाणाऱ्या जागृती होगले या महिला बाईक रायडरचा डहाणूजवळ अपघाती मृत्यू झाला.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

आजपासून पावसाळी अधिवेशन , विरोधी पक्षांमध्येच फूट

सोमवारपासून विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असताना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या ...

news

मी या संसदेची निर्मिती आहे : प्रणव मुखर्जी

लोकशाहीच्या मंदिरात अर्थात संसदेत माझ्या विचारांना पैलू पडले, मी या संसदेची निर्मिती आहे ...

news

आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदी

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचं अध्यक्षपद पुन्हा शिवसेनेकडेच आले आहे. शिवसेना नेते ...

news

गोव्यातही धरणे ८० टक्क्यांवर…

राज्यात मागील काही दिवसांपासून पडत असलेल्या जोरदार पावसामुळे बहुतेक सर्व महत्त्वाच्या ...

Widgets Magazine