गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 6 डिसेंबर 2016 (08:35 IST)

मुंबई पालघर : वाडा येथील मुलीचा मृत्यू अंगावर गेट पडले

माफ न करता येणार या प्रकरच्या गोष्टी घडत आहेत. एका अपघतात एका लहान मुलीला आपला जीव गमवावा लागला आहे. यामध्ये वृत्ता  नुसार शाळेचा लोखंडी गेट अंगावर पडून  शाळकरी मुलीचा मृत्यू झाल्याची घटना पालघर जिल्हा येथील तालूका असलेल्या  वाड्यात घडली आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक 2 मध्ये शिकणारी विद्यार्थिनी मृत्युमुखी पडलीआहे.दुसरी वर्गात शिकत असलेली  तन्वी धानवा ही मुलगी मधल्या सुट्टीत खेळत असताना शाळेचा लोखंडी गेट तिच्या अंगावर पडला होता . यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आहेत.  तर तिच्यासोबतचे इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत.दोघा जखमींना उपचारांसाठी ठाण्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. निकृष्ट बांधकाम आणि शिक्षकांच्या हलगर्जीमुळे हा अपघात झाल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. हिवाळी अधिवेशन आता सुरु असून सरकारी शाळेत असे प्रकार होत असताना विरोधी पक्षाने भूमिका घेणे महत्वाचे आहे.