Widgets Magazine

मुंबई विद्यापीठ : विविध शाखांचे 153 निकाल जाहीर

mumbai university
Last Modified सोमवार, 31 जुलै 2017 (09:07 IST)

मुंबई विद्यापीठाच्या विविध शाखांचे 153 निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. तसंच उर्वरित विविध शाखांचे 55 निकाल लवकरच जाहीर केले जातील असं विद्यापीठानं प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केलं आहे. 17 लाखांहून अधिक उत्तरपत्रिकांपैकी जवळपास 90 टक्के उत्तरपत्रिकांचं मुल्यांकन झाल्याचंही विद्यापीठाकडून जाहीर करण्यात आलं.

मुंबई विद्यापीठानं जाहीर केलेल्या निकालांमध्ये कलाशाखेचे 78, तंत्रज्ञान विभागाचे 48, विज्ञान शाखेचे 10, व्यवस्थापन शाखेचे 10, वाणिज्य शाखेचे 7, असे एकुण 153 निकाल जाहीर करण्यात आले आहेत. वाणिज्य व विधी शाखेचे निकाल वगळता बहुतांश शाखेतील 90 ते 98 टक्के मुल्यांकन झाल्याचं विद्यापीठानं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे. उर्वरित 55 निकाल तयार असून ते लवकरच जाहीर केले जाणार आहेत, असंही विद्यापीठानं स्पष्ट केलं आहे.यावर अधिक वाचा :