शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

गेले बाहुबली बघायला, चोराने केले घर साफ

'बाहुबली 2’ बॉक्स ऑफीसवर नवे रेकोर्ड बनवत आहे. प्रेक्षक मोठ्या संख्येने सिनेमा पाहण्यासाठी घरा बाहेर पडत आहे. याचाच फायदा उचलत चोरटे चोरी करत असल्याचा अनुभव नाशिकच्या ससाणे कुटुंबियांना आला आहे.

दुपारी 3 वाजेचा बाहुबलीचा शो पाहण्यासाठी गेलेल्या ससाणे कुटुंबियांच्या घरातून 8 तोळे सोनं आणि 30 हजार रुपये चोरांनी लंपास केले आहे. ससाणे कुटुंबीय हिरावाडी परिसरात राहतात. ससाणे कुटुंबियांना महिष्मती नगराची ही सफर चांगलाच महागात पडल्याची चर्चा शहरात रंगली आहे.