शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 7 जून 2017 (16:25 IST)

शेतकरी संपाला नाना पाटेकरांचा पाठिंबा

शेतकऱ्याला जगण्यासाठी संप करावा लागतो ही बाब अत्यंत खेदजनक आहे, असं मत अभिनेते नाना पाटेकर यांनी व्यक्त केलं आहे. तर शेतकरी संपाचा फुटबॉल करू नका असे वास्तववादी वक्तव्य मकरंद अनासपुरे यांनी केलं आहे. शेतकरी संपाच्या सातव्या दिवशी नाम फाऊंडेशननं शेतकरी आणि शेतकरी संपाबाबत आपली भूमिका मांडली आहे. स्वामीनाथन आयोग शक्य तितक्या लवकर लागू करण्यात यावा, तसंच ज्या शेतकऱ्यांना खरंच गरज आहे त्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अशी आग्रही भूमिका नाना पाटेकर यांनी घेतली आहे. यावेळी नाम फाऊंडेशनने आत्तापर्यंत केलेले काम मकरंद अनासपुरे यांनी माहिती दिली. तसेच आम्ही कोणत्याही प्रसिद्धीसाठी हे करत नाही तर शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि त्याचं जगणं सुसह्य व्हावं ही एकमेव भावना आमच्या मनात आहे असं अनासपुरे यांनी म्हटलं आहे. फक्त राजकारणातल्याच नाही तर विविध क्षेत्रातल्या लोकांनी, प्रसिद्ध आणि सधन व्यक्तींनी एकत्र येऊन शेतकऱ्याला आधार दिला पाहिजे असंही पाटेकर यांनी म्हटलंय.