गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 मार्च 2017 (00:18 IST)

नागपूरचा महापौर ठरला

महाराष्ट्राच्या विधर्भ आणि नागपूरला  महापौर मिळाला आहे. नागपूरच्या महापौरपदी भाजपच्या नंदा जिचकार विराजमान तर  उपमहापौरपदी भाजपच्या दीपराज पार्डीकर यांची निवड झाली आहे. नागपूर महापालिकेत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाल्यामुळे सर्व महत्वाच्या ठिकाणी भाजपाचे नगरसेवक विराजमान होणार आहे. 
 
महापौरपदाच्या मतदानावेळी नंदा जिचकार यांना 108 मतं मिळाली आहे. तर काँग्रेसतर्फे महापौरपदाच्या उमेदवार असलेल्या स्नेहा निकोसे यांना 26, तर बसपच्या उमेदवार वंदना चांदेकर यांना 10 मतं मिळाली. जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया संपन्न झाली आहे.