Widgets Magazine
Widgets Magazine

२० जुलै ते २० ऑगस्ट दरम्यान ‘जवाब दो’ आंदोलन

dabholkar
Last Modified सोमवार, 17 जुलै 2017 (10:02 IST)
डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 20 जुलै रोजी चार वर्षे पूर्ण होत आहेत. पण अजूनही त्यांचे मारेकरी सापडले नाहीत. त्याविरोधात २० जुलै ते २० ऑगस्ट दरम्यान ‘जवाब दो’ आंदोलन असून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन केले जाणार आहे. अशी माहिती अंनिसचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिली आहे.
Widgets Magazine
मारेकऱ्यांची नावे तसेच दाभोलकरांच्या हत्येशी संबंधित असलेल्या संघटनांची नावे समोर आली असूनही याविरोधात ठोस कारवाई होत नाहीत. याचा तपास करण्यासाठी तपास यंत्रणा सक्षम आहे, परंतु राजकीय इच्छाशक्ती दिसत नाही. त्याविरोधात हे 'जवाब दो' आंदोलन असून संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात हे आंदोलन केले जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यातील आमदार खासदाराला भेटून याचा जाब विचारून निवेदन देण्यात येणार आहे, असे अविनाश पाटील यांनी सांगितले.

Widgets Magazine

यावर अधिक वाचा :