testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

चांदवड टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त

nashik banduk
Last Modified शुक्रवार, 15 डिसेंबर 2017 (17:23 IST)
२५ रायफल्स, १९ गावठी कट्टे आणि ४००० जिवंत काडतुसे सापडली
नाशिक जिल्ह्यातील चांदवड टोल नाक्याजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २५ रायफल्स, १९ गावठी कट्टे आणि ४००० जिवंत काडतुसे आढळली आहे. याप्रकरणी नागेश राजेंद्र बनसोडे (२३), सलमान अमानुल्ला खान (१९), आणि
बद्रीनुजमान अकबर बादशाह उर्फ सुमीत (२७) यांना अटक करण्यात आली. याबाबत अधिक चौकशी केली असता उत्तर प्रदेशातील कानपुर येथील एका शस्त्रात्र गोदामातील चोरीचे शस्त्रास्त्र असल्याची माहिती दिली आहे.
nashik cm
याप्रकरणात गुरुवारी सायंकाळी सुमारे सहा वाजता मालेगाव तालुक्यातील वाके फाट्यावरील शाई सुमन पेट्रोल पंप येथे बोलेरो जीप क्रमांक एमएच ०१ एस. ए.७४६० ही गाडी डिझेल भरण्यासाठी आली होती. पंप कामगाराने जीप मध्ये २७०० रुपयाचे डिझेल भरले. मात्र जीप चालकाने पैसे न देताच पोबारा केला. सदर घडलेल्या प्रकार तालुका पोलिसांना कळवताच तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतिश गावित यांनी सदर गाडीची माहिती चांदवड पोलीसांना बिनतारी संदेशाद्वारे दिली. त्यानंतर चांदवड टोलनाक्यावर जीप अडविण्यात आली असता जीप मधील प्रवाशाने पिस्तुलाचा धाक दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा सदरचा प्रयत्न हाणून पाडला. जीपमधील तिघांना गाडीसह थेट चांदवड पोलीस ठाण्यात आणले. यावेळी त्यांची व जीपची कसून तपासणी केली असता जीपच्या टपावर एक कप्पा बनविण्यात आल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यात काही तरी असल्याची शंका बळावल्याने पोलिसांनी तपासणी केली असता त्यातुन १७ रिव्हॉल्व्हर, दोन विदेशी पिस्टल, २४ रायफल्स, १२ बोअरची चार हजार १३६ काडतुसे व ३२
बोअरची १० काडतुसे हस्तगत करण्यात आली.गाडीत मोठ्या प्रमाणात लपविण्यासाठी विशिष्ट पद्धतीचे खाचे करण्यात आले होते. ज्यामध्ये एवढ्या प्रमाणात शस्त्रं लपविण्यात आली होती.


यावर अधिक वाचा :

आता लग्नाच्या खर्चावर सरकारचा डोळा

national news
आता आपल्या घरात होणार्‍या लग्नसरायांवर होणार्‍या खर्चावर सरकारचा डोळा असणार आहे. सुप्रीम ...

ब्रिटनकडून फेसबुकला पाच लाख पौंडांचा दंड

national news
फेसबुकवर ब्रिटनच्या माहिती नियंत्रकाने पाच लाख पौंडांचा दंड ठोठावला आहे. केम्ब्रिज ...

जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप, हिमा दासला सुवर्णपदक

national news
भारतीय महिला धावपटूने जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत ४०० मीटर प्रकारात २० ...

बाप्परे, तरुणाने फेसबुकवर लाईव्ह करत केली आत्महत्या

national news
पाचवेळा प्रयत्न करुनही भारतीय लष्करात भरती होऊ शकली नसल्याने नाराज झालेल्या मुन्ना कुमार ...

जगातील सर्वात लांब नखे कापली

national news
जगातील सर्वात लांब नखांचा विक्रम नावावर असलेल्या आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये ...

बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट ट्विटर बंद करणार

national news
बनावट आणि आॅटोमेटेड अकाउंट बंद करण्याची मोहीम ट्विटर हाती घेणार आहे. त्यामुळे ज्यांच्या ...

ग्राहकांचा फायदा, सर्व कंपन्यांची नेट सेवा एकाच दरात मिळणार

national news
दूरसंचार विभागाने नवीन धोरण तयार केले असून यात मोबाइल ग्राहकांना सर्व कंपन्यांची नेट सेवा ...

अफवा रोखण्यासाठी 'फॉरवर्ड मेसेज इंडिकेटर' फिचर आले

national news
अफवा, फेक न्यूज आणि फेक संदेश रोखण्यासाठी व्हाट्सअॅपने एक नवे फिचर सुरू केले आहे. या ...

वायफाय राऊटरची देखभाल

national news
स्मार्टफोनचा वापर वाढल्यापासून घराघरांत वायफाय राऊटर दिसू लागले आहेत. वायफायमुळे वेगाने ...

Oppo Find X 12 जुलै रोजी भारतात होईल लाँच, जाणून घ्या ...

national news
तुम्ही अशा फोनबद्दल नक्कीच ऐकले असेल, ज्यात सेल्फी कॅमेरा दिसत नाही बलकी फोटो काढताना तो ...