testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

नाशिक महानगरपालिकेत गायीला श्रद्धांजली

nashik municipal corp
Last Modified शनिवार, 22 जुलै 2017 (09:43 IST)
नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहात गुरुवारी एका गायीला श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रकरणात नाशिकमध्ये
13
जुलैला एका गायीचा मृत्यू झाला. खड्ड्यात पडल्यानंतर विजेचा धक्का लागल्याने गायीचा मृत्यू झाला. सदरचा खड्डा महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून खणण्यात आला होता. या अपघातानंतर नाशिकच्या वॉर्ड नंबर25
चे शिवसेना नगरसेवक श्यामकुमार साबळे यांनी गायीवर अंत्यसंस्कार केले. गायीच्या मृत्यूसाठी साबळे यांनी नाशिक महापालिकेला जबाबदार ठरवलं होतं. गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत साबळे यांनी मृत गायीला श्रद्धांजली वाहण्याचा प्रस्ताव मांडला. सत्ताधारी भाजपसह इतर पक्षीय नगरसेवकांनी हा प्रस्ताव स्वीकारुन गायीला श्रद्धांजली वाहिली. आता गायीच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीचे आदेशही महापौरांनी दिले.


यावर अधिक वाचा :