Widgets Magazine
Widgets Magazine

नाशिक महापौर पदाची निवड १४ मार्चला

गुरूवार, 2 मार्च 2017 (16:54 IST)

nashik mahapalika

नाशिकच्या महापौर पदाची निवड येत्या १४ मार्चला होणार आहे. यासाठी पिठासन अधिकारी म्हणून नाशिकचे जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिकमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत असल्यामुळे महापौर पदाची खुर्ची भाजपच्याच उमेदवाराकडे असणार आहे. अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या महापौर पदासाठी पंचवटी विभागातून चार नगरसेवक  असले तरी योग्य निकषांच्या आधारावर महापौर म्हणून कुणाही एकास संधी मिळण्याची शक्यता आहे. नाशिककरांनी एकहाती सत्ता दिल्याने भाजपची जबाबदारी वाढली असून या काळात नाशिकचा सर्वांगीण विकास नागरिकांना अपेक्षित राहणार आहे. त्यामुळे पक्षाला महापौर पदाचा दावेदार निश्चित करताना पक्षासाठी दिलेले योगदान, ज्येष्ठत्व, कामाचा दांडगा अनुभव अशा सर्व निकषांचा विचार होण्याची शक्यता आहे. पाच वर्षांच्या कार्यकाळात जास्तीत जास्त नगरसेवकांना विविध पदांवर काम करण्याची संधी मिळावी यासाठी पक्षाकडून प्रयत्न केले जाण्याची शक्यता असल्याने अडीच वर्षांसाठी असलेले महापौर पद हे पक्षीय स्तरावर सव्वा वर्षासाठी करण्याचादेखील भाजपकडून निर्णय होण्याची शक्यता आहे. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

पदमश्री डॉ. तात्याराव लहाणे नेत्ररोग शस्त्रक्रियांसाठी नाशिक येथे पुन्हा दाखल

नाशिक येथे पालकमंत्री ना.गिरीष महाजन यांनी आयोजित केलेल्या विनामुल्य् महाआरोग्य् शिबिरात ...

news

लातूर येथे महा स्वच्छता अभियान

अलिबागच्या डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाच्या साडेपाच हजार कार्यकर्त्यांनी ...

news

दानवे परिवार लग्न उद्धव यांचा जय महाराष्ट्र

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मुलाच्या ...

news

जगात महागड्या शहरांमध्ये मुंबई 21 व्या स्थानी

जगातील सर्वात महागड्या शहरांच्या यादीत मुंबईचा 21 क्रमांक लागला आहे. नाईट फ्रँक वेल्थ ...

Widgets Magazine