testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

2430 घरांना पुरेल इतकी सौरऊर्जा निर्मिती

solar
विजेचा तुटवडा आणि महागडे दर यामुळे सौरुर्जेचा वापर हि आता काळाची गरज बनू लागली आहे. केवळ पथदीप किंवा घरातील ऊर्जेपुरताच मर्यादित न राहता सौरऊर्जा आता शेती पाम्पांपासून ते उद्योगांच्या उत्पादनांपर्यंत मोलाची भूमिका बजावू लागली आहे. शेतीमालावर अवलंबून असलेल्या येथील कडून सतरा लाख पन्नास हजार युनिट्स सौरउर्जेचीनिर्मिती केली जात आहे. यातून २४३० घरांना वर्षभर मिळेल इतकी वीजनिर्मिती होत आहे. सुलाच्या एकूण वीज वापरा पैकी पन्नास टक्के विजेची बचत या उपक्रमातून साधली जात आहे. इतरही कृषी जोडधंदे किंवा कृषी पूरक उद्योगांनी अशा ऊर्जेची निर्मिती करावी व बचत साधावी याकरता आदर्श ठेवला आहे.
वीज निर्मितीकरिता सुलाने १.२७ मेगावॉट क्षमतेचे सोलर पॅनल्स उभारलेले असून त्यातून सतरा लाख पन्नास हजार युनिट्स ऊर्जा तयार होते. एका गावातील एका घराचा वीज वापर दर महिन्याला सरासरी साठ युनिट्स इतका असतो. म्हणजेच एका घराला सरासरी सातशे वीस युनिट्स इतकी ऊर्जा लागते. या गणितानुसार, एका गावातील 2430 घरांना वर्षभर मिळेल इतकी वीज येथे तयार होत आहे. हि वीज संपूर्ण उद्योगाला लागणाऱ्या विजेचा पन्नास टक्के वाटा उचलते. याचा विचार करता, सतरा लाख पन्नास हजार युनिट्स सौरऊर्जा हि ११७८ मेट्रिक टन कार्बनडायऑक्साईड वातावरणात जाण्यापासून वाचवते. यामुळे प्रकल्पाची मोठ्या प्रमाणात आर्थिक बचत होत आहे.
येथे होणार्‍या सौरऊर्जेच्या वापराचे आणखी काही फायदे:
* छपरांवर सोलर पॅनल्स बसवण्याचा एक अप्रत्यक्ष फायदा म्हणजे, या पॅनल्स मुळे वास्तूची छपरे तापत नाहीत. कारण सूर्याची सर्व उष्णता हि पॅनल्समध्ये शोषली जाते आणि छपरे थंड राहतात. त्यामुळे बिल्डिंग्स थंड राहतात, आणि पंखे किंवा एसी करता वापरावी लागणार्‍या ऊर्जेचे प्रमाण कमी होते.

*
पाणी तापवण्याकरता सौर ऊर्जेचा वापर: वायनरी, रिसॉर्ट आणि इतर उपक्रमांना लागणारे गरम पाणी – क्षमता- २१००० लीटर. या उपक्रमामुळे बॉयलरला लागणारे २३००० लीटर डिझेल वाचते. म्हणजे पुन्हा वातावरणात सोडल्या जाणाऱ्या ३३ मॅट्रिकटन कार्बनडायआँक्साईडचे उत्सर्जन टाळले जाते.
*
स्काय लाइट्स – सुलाने आपल्या वायनरी आणि कार्यालयांमध्ये १५१ स्काय लाइट्स बसवले आहेत, ज्यामुळे विजेची ३८६१२ युनिट्स वाचतात. हा आकडा देखील प्रकाशासाठी लागणाऱ्या एकूण ऊर्जेच्या 50 टक्के आहे.


यावर अधिक वाचा :

अशी रंगली राज ठाकरे यांनी घेतलेली शरद पवारांची मुलाखत

national news
समाजात जातीयद्वेष हीच सध्या चिंतेची बाब आहे. मूठभरांच्या स्वार्थासाठी प्रशासकीय पाठबळावर ...

सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल नंबर हे १० आकडीच राहणार

national news
दूरसंचार विभागाने बीएसएनएल आणि इतर कंपन्यांना त्यांचे मशीन-टू-मशीन म्हणजेच एम-टू-एम ...

पंजाब नॅशनल बॅंकेत सुमारे १८ हजार कर्मचाऱ्यांच्या बदल्या

national news
पंजाब नॅशनल बॅंकेत झालेल्या ११५०० हजार कोटींच्या घोटाळ्यानंतर पहिल्यांदाच बॅंकेने पाऊले ...

पोंझी स्कीम वाल्यांनो सावधानाता बाळगा नवीन कायदा

national news
नागरिकांना आकर्षक जाहिरातींद्वारे फसवून बेकायदेशीररित्या पोंझी स्कीम चालवणारे व ...

ग्राहकांना चुना लावत होते मोदी !

national news
नीरव मोदी प्रकरणात सीझ करण्यात आलेल्या डायमंड्सची किंमत आकलन करण्याचे प्रयत्न सुरू आहेत ...

नोकिया 6चं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च

national news
एचएमडी ग्लोबलने नोकिया 6 या फोनचं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. हा स्मार्टफोन ...

‘अॅपल’ च्या जाहिरातीमध्ये संगीतकार ए.आर.रहमान झळकला

national news
‘अॅपल’ च्या एका जाहिरातीमध्ये संगीतकार ए.आर.रहमान झळकला आहे. खुद्द रहमाननेच ट्विट करत ...

1 जुलैपासून 13 अंकांचे होतील मोबाईल नंबर

national news
नवी दिल्ली- 1 जुलै 2018 नंतर आपण मोबाईल नंबर घेत असाल तर आपल्याला दहा ऐवजी 13 अंकांचा ...

म्हणून ट्विटरच्या टीमने घेतली अमिताभ यांची भेट

national news
काही दिवसांपूर्वी महानायक अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून काढता पाय घेण्याचा इशारा दिला ...

एअरटेलची नवी ऑफर, अवघ्या ९ रुपयाचा प्लान

national news
आता एअरटेलने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवी ऑफर सादर केली आहे. ज्यामध्ये ग्राहकांना ...