शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

त्र्यंबकेश्वरचा मौल्यवान हिरा लेबनॉनमध्ये

बारा ज्योतिर्लिंगात एक त्र्यंबकेश्वराला पेशवा नाना साहेब यांनी चढवलेला अत्यंत मौल्यवान नस्स्क हिरा सध्या लेबनॉन येथील रॉबर्ट मोउवाद संग्रहालयाची शोभा वाढवत आहे. त्र्यंबकेश्वराची ट्रस्टी ललिता शिंदे देशमुख यांनी पंतप्रधान, राष्ट्राध्यक्ष आणि परराष्ट्र मंत्र्यांना पत्र लिहून हा हिरा परत आण्याची मागणी केली आहे.
 
ललिता यांच्याप्रमाणे हा मौल्यवान हीर्‍याला महादेवाचा तिसरा नेत्र असेही म्हटलं जातं. याची किंमत कोहिनुरापेक्षा कमी नाही. पेशवा नाना साहेब यांनी त्र्यंबकेश्वर किल्ला काबीज करण्यासाठी नवस केला होता. नवस पूर्ण करण्यासाठी त्यांनी 1725 साली मंदिराचे जीर्णोद्धार करवले आणि महादेवाला हा मौल्यवान हिरा अर्पित केला. तेव्हापासून 1817 मध्ये जळगावच्या जवळ झालेल्या तिसर्‍या मराठा-इंग्रज युद्धापर्यंत हा हिरा त्र्यंबकेश्वरामध्ये महादेवाच्या संपत्ती रूपात संरक्षित राहिला. त्र्यंबकेश्वर मंदिर नाशिकच्या जवळ असल्यामुळे या हीर्‍याचे नाव नस्सक असे पडले.
 

हीर्‍याचा इतिहास
 
सूत्रांप्रमाणे हा हिरा आंध्र प्रदेशच्या महबूबनगर जवळ स्थित अम‍रगिरीच्या खाणेतून प्राप्त झाला होता. नंतर हा म्हैसूर च्या साम्राज्यच्या खजिन्यात राहिला. येथून त्याला मुघल लुटून दिल्ली घेऊन गेले मराठांद्वारे दिल्लीवर हल्ल्यानंतर हा हिरा मराठा खजिन्यात पोहचला होता.
 
असे म्हणतात की 1818 मध्ये इंग्रजांकडून पराभव झाल्यावर अंतिम पेशवा बाजीराव द्वितीय यांनी हा हिरा इंग्रज कर्नल जे ब्रिग्सला सोपवला होता. ब्रिग्सने हा हिरा आपल्या अधिकारी फ्रान्सिस रावडन हेस्टिंग्सला सोपवले होते. हेस्टिंग्सच्या हाताने हा ईस्ट इंडिया कंपनीची संपत्ती बनला आणि विक्रीसाठी लंडनच्या हिरा बाजारात पोहचला. तेव्हा या 89 कॅरेट अर्थात 17.8 ग्राम हीर्‍याची किंमत 3000 पाउंड लावण्यात आली होती. ईस्ट इंडिया कंपनीने हा हिरा ब्रिटिश ज्वेलरी कंपनी रंडेल अँड ब्रिजला विकला. कंपनीने हा हिरा तराशून 13 वर्षांनंतर इमैनुअल ब्रदर्सला 7200 पाउंडामध्ये विकला होता. 1886 मध्ये या हीर्‍याची किंमत 30 ते 40 हजार पाउंड लावण्यात आली होती. परंतू हा हिरा लेबनॉन कसा पोहचला हे स्पष्ट नाहीये.