शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 ऑक्टोबर 2017 (14:26 IST)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाची राज्यस्तरीय बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाची राज्यस्तरीय बैठक आज राष्ट्रवादी भवन, मुंबई येथे झाली. यानिमित्ताने सध्या देशात असलेल्या अस्वस्थ वातावरणाबाबत चर्चा झाली. स्वतःला आंबेडकरी नेते म्हणवून घेणारे नेते दलित तरुणांना दारू पिण्यास सांगत आहेत. ही सध्याची दुर्दैवी परिस्थिती आहे. देशाची घटना बदलण्याचा प्रयत्न हे सरकार करत आहे. सरसंघचालक म्हणतात आरक्षणाबाबत फेरविचार करायला हवा. बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून या देशातील उपेक्षित घटकांना न्याय मिळावा म्हणून आरक्षणाची तरतूद केली. आरक्षणाबाबत सरकारने चुकीचा निर्णय घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी स्वस्थ बसणार नाही.

आंबेडकर स्मारकाबाबत सरकारने मोठा गाजावाजा केला. मुळात आंबेडकरांच्या स्मारकाची संकल्पना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची होती. आदरणीय पवार साहेब व आदरणीय अजित पवार यांनी वेळोवेळी त्याबाबत प्रयत्न केला होता. या सरकारने स्मारकाचे भूमीपूजन केले पण आज तीन वर्ष झाली सरकार येऊन तरी स्मारक बांधलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाने याबाबत आंदोलन छेडावे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांना संपूर्ण पाठिंबा देईल.

आजही काही ठिकाणी सामाजिक विषमता पाळली जाते ती संपवण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्याने करायला हवे. समाजात प्रत्येकाला न्याय मिळायला हवा अशी भूमिका आदरणीय शरद पवार साहेबांची असते. याच भूमिकेसाठी आपण कार्यरत राहायला हवे, अशी अपेक्षा या बैठकीत व्यक्त केली.