testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे गोलमाल अगेन – नवाब मलिक

Last Modified सोमवार, 23 ऑक्टोबर 2017 (16:57 IST)

अद्यापही मुंबई विद्यापीठाच्या ११ हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर केले गेले नाहीत. त्यामुळे या विद्यापीठाचा कारभार म्हणजे गोलमाल अगेन असेच म्हणावे लागेल असा खोचक टोला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक

यांनी लगावला. विद्यापीठाच्या भोंगळ कारभारावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले.

मलिक म्हणाले की आतापर्यंत ज्या विद्यार्थ्यांचे निकाल लागले आहेत त्यात मोठी तफावत जाणवली आहे. विद्यार्थ्यांच्या निकालात मोठ्या चुका आढळून आल्या आहेत. या परिस्थितीला राज्य सरकार तसेच शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे असा आरोपही त्यांनी केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या फेरीवालाविरोधी आंदोलनाबाबत बोलताना मलिक म्हणाले की मनसेला आता कोणी विचारत नाही, निदान या आंदोलनामार्फत तरी राजकीय यश मिळेल का यासाठी मनसे प्रयत्न करत आहे. फेरीवालाविरोधी आंदोलन जरी मनसेचे असले तरी मुख्यमंत्री त्याला हँडल करत आहेत असा आरोप मलिक यांनी केला.यावर अधिक वाचा :