गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नयना पुजारी बलात्कार आणि हत्या : तिघे दोषी

नयना पुजारी बलात्कार आणि हत्या प्रकरणात विशेष न्यायाधीश एल.एल येनकर यांच्या न्यायालयाने तिघांना दोषी ठरविले. सात वर्षानंतर या खटल्याचा निकाल लागला. योगेश अशोक राऊत (24 ), महेश बाळासाहेब ठाकूर (24), विश्‍वास हिंदूराव कदम ( 26,) अशी दोषीची  नावे आहेत. या गुन्ह्यातील आरोपी राजेश पांडुरंग चौधरी हा माफीचा साक्षीदार झाला ही या खटल्याच्या सुनावणीमधील महत्वाची घटना ठरली. 
 
आरोपींविरुद्ध अपहरण, बलात्कार, खून करणे, चोरी करणे, पुरावा नष्ट करणे आदी कलमांनुसार आरोप ठेवण्यात आले होते.  चौधरी याचा फौजदारी दंड संहिता कलम 164 नुसार न्यायदंडाधिकाऱ्यांनी नोंदविलेला जबाब, विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर यांनी 37 जणांची नोंदविलेली साक्ष, आरोपींविरुद्ध पोलिसांनी सादर केलेला भक्कम परिस्थितीजन्य आणि वैद्यकीय पुरावा, आरोपी आणि पीडित पुजारी यांना एकत्रित पाहणाऱ्यांची साक्ष अशा मुद्यांच्याआधारे आरोपींनीच हा गुन्हा केल्याचे सिध्द झाले.