गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

नयना पुजारी अपहरण, बलात्कार प्रकरण : तीनही दोषींना फाशी

संगणक अभियंता नयना पुजारी अपहरण, बलात्कार व खून प्रकरणातील तीनही दोषींना विशेष न्यायाधीश एल. एल. येनकर यांनी फाशीची शिक्षा सुनावली आहे. त्यांना अपहरण, जबरी चोरी, सामूहिक बलात्कार, हत्या, मृताच्या शरिरावरील ऐवज चोरणे, कट रचणे अशा सहा गुन्ह्यांखाली दोषी ठरवण्यात आले. तर माफीचा साक्षीदार राजेश चौधरी याची निर्दोष मुक्ता केली  आहे.

योगेश अशोक राऊत (32), महेश बाळासाहेब ठाकूर (31), विश्‍वास हिंदूराव कदम (34) अशी फाशीची शिक्षा सुनावलेल्या दोषींची नावे आहेत. या खटल्यामध्ये सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील हर्षद निंबाळकर काम पहात आहेत. तर बचाव पक्षातर्फे अ‍ॅड. बी.ए.आलुर, अ‍ॅड. रणजित ढोमसे-पाटील आणि अ‍ॅड. अंकुश जाधव काम पाहिले.