मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

अण्णा हजारेंच्या निषेधार्थ पुतळ्याचे दहन

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  औरंगाबाद येथे अण्णा हजारें यांच्या निषेधार्थ त्यांच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.
 
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी या दहन आंदोलनाच्या भूमिकेचे समर्थन करताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय पवार साहेब व विधान सभेतील नेते माननीय अजितदादा पवार यांच्यावर अण्णा हजारे वैयक्तिक आकसाने बिनबुडाचे आरोप करत आले आहेत. मात्र गेल्या दोन वर्षांत दोन हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नोटाबंदीनंतर १०० नागरिक मृत्यू पावले. तेव्हा अण्णा हजारे झोपले होते काय? त्याबाबत त्यांनी काहीच आवाज उठवलेला नाही. या सरकारच्या निर्णयांविषयी अण्णा मूग गिळून बसलेले आहेत.
 
आमच्या आदरणीय नेत्यांवरील अप्रस्तुत टीका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस कदापि सहन करणार नाही. आणि आकसापायी नेत्यांवर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या अण्णा हजारे यांना आम्ही महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशाराही संग्राम कोते पाटील यांनी यावेळी दिला.
 
या दहन आंदोलनाप्रसंगी, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय पाटील व शहर कार्याध्यक्ष मयूर सोनवणे तसेच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव शैलेश भिसे, कयुम शेख, अक्षय शिंदे, संदीप जाधव, राज तायडे, विजय वाकडकर, रोहन जाधव, नितीन किर्तीशाही, योगेश सोळंके, कृष्णा नायकाल यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदवला.