गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 एप्रिल 2021 (16:11 IST)

कोण होणार नवा गृहमंत्री? या नावांवर चर्चा

मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआय चौकशीचे आदेश दिल्यानंतर अनिल देशमुख यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. शरद पवारांनी यासाठी होकार दिला आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.
 
सीबीआय चौकशी करत असताना गृहमंत्री पदावर राहणं योग्य नसल्यामुळे देशमुख यांनी राजीनामा दिला. आता गृहमंत्रीपदी कोणाचा वर्णी लागणार याची चर्चा सुरु झाली आहे. राष्ट्रावादीच्या गोटात यापूर्वीच यावर विचार करण्यात आलेला असून आता हे पद अजित पवार, राजेश टोपे आणि जयंत पाटील यांपैकी एकाला सोपवण्यात येऊ शकतं. परंतू शरद पवार कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतील हे बघायचे आहे.
 
इकडे नवाब मलिक यांना गृहखात्याचा पदभार कोणाकडे असेल असं विचारण्यात आलं असताना त्यांनी म्हटले की एखाद्या मंत्र्याने राजीनामा दिल्यानंतर साहजिकच मुख्यमंत्र्यांकडे त्या खात्याची जबाबदारी असते. नंतर ही जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवली जाईल. तिन्ही पक्ष चर्चा करुन निर्णय घेतील असे त्यांनी म्हटले.
 
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या खंडणीखोरीच्या गंभीर आरोपांवरून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर राजीनामा द्यावा लागला. परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपये पोलिसांमार्फत वसूल करण्यास सांगितल्याचा गंभीर आरोप केला होता. या प्रकरणी परबीर सिंग यांनी कोर्टात याचिका दाखल होती.