मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 6 मार्च 2017 (15:56 IST)

परिचारक यांना तात्काळ निलंबित करा

विधानपरिषद सदस्य प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींविषयी काढलेल्या अवमानकारक वक्तव्या प्रकरणी परिचारक यांना तात्काळ निलंबित करावं, अशी मागणी भाजप वगळता सर्वपक्षीय आमदारांनी केली आहे.

विधानपरिषदेचे सदस्य असलेल्या प्रशांत परिचारक यांनी सैनिकांच्या पत्नींविषयी अवमानकारक वक्तव्य केलं. यामुळे विधानपरिषद सभागृहाचाच एकप्रकारे अवमान झाला आहे. अशा सदस्यांना तात्काळ निलंबित करावं, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर या आमदाराला फासावर द्या, असं म्हणाले असते, असं सांगत शिवसेनेच्या आमदार निलम गोऱ्हे यांनी प्रशांत परिचारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.