गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

स्कॉटलंड यार्डची मदत घेता येणार नाही

समाजसुधारक आणि विचारवंत असलेले डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणात वर्षभराच्या प्रतिक्षेनंतर स्कॉटलंड यार्डची मदत घेता येणार नाही, अशी माहिती सीबीआयने आज मुंबई हायकोर्टात दिली. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या तपासात स्कॉटलंड यार्ड कोणतीही मदत करु शकणार नाही, असा अहवाल सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात सादर केला आहे. 
 
डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याकांडात वापरण्यात आलेल्या बुलेट्स आणि इतर पुरावे सीबीआयने स्कॉटलंड यार्डला तपासासाठी पाठवले होते.भारत आणि इंग्लंडमध्ये अशाप्रकारच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आवश्यक असलेला करार अस्तित्वात नसल्याने, ही असमर्थता स्कॉटलंड यार्डने लेखी स्वरुपात कळवल्याचं सीबीआयने सांगितलं आहे.तपास यंत्रणेच्या संथ काराभारावर निषेध नोंदवत दाभोलकर-पानसरे कुटुंबियांनी आणि अंनिसच्या कार्यकर्त्यांनी, या दोन्ही हत्याप्रकरणातील फरार तसंच संशयित आरोपींचे फोटो हातात घेऊन हायकोर्टाबाहेर मूक आंदोलन केले असून त्यांनी हायकोर्टात दाभोलकर-पानसरे कुटुंबियाने तपासकार्यावर असहमती नोंदवून तपास चुकीच्या दिशेने आणि संथ गतीने होत असल्याचा आरोप केला आहे.