गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

मी ती मुलाखत चोरूनसुद्धा पाहिली नाही - उध्वव ठाकरे

महामुलाखत काय ते माहित नाही तर मी ती  मी ती मुलाखत चोरूनसुद्धा पाहिली नाही असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. बाळासाहेब होते तेव्हा त्यांना अटक करण्यात येणार होती तेव्हा कोठे होती मैत्री, बाळासाहेब ठाकरे यांचे सर्वच विचार योग्य होते असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. दैनिक सामना मध्ये प्रसिद्ध झालेली खालील पत्रकार परिषद .
 
पीएनबी बँकेला ११,३०० कोटींचा चुना लावून फरार झालेल्या नीरव मोदीमुळे या बँकेतील सामान्य खातेदारांच्या जीवाला घोर लागला आहे. आपले पैसे ज्या बँकेत आहेत त्या बँकेत असा घोटाळा होणार नाही ना असा प्रश्नही खातेदारांना सतावतोय. या खातेदारांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहणार असल्याचं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.
 
मुंबईतील शिवसेनाभवनात उद्धव ठाकरे यांना पत्रकारांनी विविध प्रश्न विचारले या प्रश्नांना उत्तर देत असताना देशभरात चर्चा सुरु असलेल्या पीएनबी बँक घोटाळ्याबद्दलही ते विस्ताराने बोलले. सेवानिवृत्त नागरीक बँकांमध्ये त्याच्या आयुष्यभराची कमाई जमा करत असतो. मात्र जर बँक बुडाली तर नियमानुसार त्याला फक्त दीड लाखांची हमी दिली जाते. सामान्य माणसाने घाम गाळून जो पैसा कमावलेला आहे तो पैसा त्यांना मिळाला पाहीजे ही शिवसेनेची भुमिका असल्याचं ठाकरे म्हणाले. याबाबत शिवसेनेचे खासदार लवकरच अर्थमंत्री अरूण जेटली यांची भेट घेणार असून त्यांना ही बाब निवेदनाद्वारे सांगणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
 
नीरव मोदी, विक्रम कोठारी यांनी बँकांना अशरक्ष: लुटलं यापूर्वी विजय मल्ल्याही बँकांना ९ हजार कोटींचा चुना लावून फरार झाला आहे. नीरव मोदीबाबत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की मोदीला हजार कोटींचं कर्ज दिलं कसं ? कारण नोटबंदीच्या काळात पैसे भरताना आणि काढताना हजारो प्रश्न विचारले जात होते. त्याच वेळी हे पैसे खाल्ले ,ते कसं काय झालं, या प्रश्नाचं उत्तर कोणीच द्यायला तयार नाहीये. जो-तो याचं उत्तर अंगावरील झुरळ झटकल्याप्रमाणे झटकतंय. या घोटाळ्यात राफेलचा घोटाळा बाजूला पडला असल्याची टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.