Widgets Magazine
Widgets Magazine

लेखक, दिग्दर्शक, गीतकार अजेय झणकर यांचे निधन

सोमवार, 3 एप्रिल 2017 (09:28 IST)

ajey jhankar

लेखक, दिग्दर्शक, गीतकार अशी ओळख असलेल्या अजेय झणकर यांचे निधन झाले आहे. पुण्याच्या सह्याद्री रुग्णालयात झणकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

‘सरकारनामा’ चित्रपटातून राजकीय संघर्ष त्यांनी गडद केला होता. झणकर यांचं शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झालं होतं. पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत त्यांनी लेखनाचे विशेष पारितोषिक पटकावल्यानंतर त्यांच्या लेखनप्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.
 
झणकर यांनी जाहिरात क्षेत्रात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली होती. ‘मार्केट मिशनरीज’ संस्थेचे ते संस्थापक होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या मुंबई आवृत्तीसाठी त्यांनी अनेक वर्षे काम केलं. झणकर यांच्या ‘सरकारनामा’ व ‘द्रोहपर्व’ या दोन कादंबऱ्यांनी मराठी साहित्यविश्वात वेगळं स्थान निर्माण केलं.

‘लेकरु’ या चित्रपटाचे निर्माते आणि पटकथाकार म्हणूनही झणकर प्रसिद्धीस आले. ‘वडगावच्या लढाईत इंग्रज जिंकते, तर हिंदुस्थान 1779 सालीच पारतंत्र्यात गेला असता,’ असं सांगणारी ‘द्रोहपर्व’ ही  त्यांची कादंबरी गाजली. ‘दोहपर्व’ कादंबरीवर ‘सिंग्युलॅरिटी’ हा हॉलिवूड चित्रपट तयार झाला. मराठी लेखकाच्या साहित्यकृतीवर बेतलेला हा पहिलाच हॉलिवूड चित्रपट ठरला.
 Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

आणखी पाच शहरांचा समावेश ‘उडान’ योजनेत करा

‘उडान’ योजनेत राज्यातील आणखी पाच शहरांचा समावेश करा, अशी मागणी राज्य सरकारने केंद्र ...

news

शाळेच्या बसला अपघात 40 विद्यार्थी गंभीर जखमी

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात शाळेच्या बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ...

news

योगी आदित्यनाथ यांना झेड प्लस सुरक्षा

उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले योगी आदित्यनाथ यांच्या सुरक्षाव्यवस्थेत ...

news

पोलंडमध्ये भारतीय विद्यार्थ्यावर हल्ला

हल्लेखोराने हल्ल्यापूर्वी पोलिश भाषेत तरुणाला उद्देशून काही विधान केले आणि यानंतर त्याने ...

Widgets Magazine