testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

देशातील सर्वात मोठी बाजरपेठ लासलगाव बाजार समिती अनिश्‍चित काळासाठी बंद

onion
Last Updated: मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016 (17:08 IST)
व्यापारी वर्गाकडे शेतकर्‍यांना देण्यासाठी लहान स्वरूपातील चलन नसल्याने आशिया आणि देशातील सर्वात मोठी कांदा बाजारपेठ असलेली लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही अनिश्‍चित काळासाठी बंद करण्यात आल्याचे माहिती कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती जयदत्त होळकर यांनी दिलेली आहे.
पाचशे, हजार रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जात नसल्याने गेल्या पाच दिवसांत जिल्ह्यातील पंधरा बाजार समित्यांत १०० कोटींचे व्यवहार ठप्प झाले आहेत. लासलगावसह जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये प्रामुख्याने उन्हाळ कांद्याची विक्री होत असून, हा कांदा एप्रिल व मेमध्ये साठवणूक केलेला आहे. त्यामुळे तो खराब होत असून, शेतकर्‍यांना हा कांदा विक्री करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यातच नवीन लाल कांदा बाजार आवारात येण्यास सुरुवात झाल्याने व तो टिकाऊ नसल्याने काढणीनंतर शेतकर्‍यांना हा कांदा लगेच विक्री करावा लागत आहे. मका, सोयाबीनची काढणी जोरात सुरू आहे. येत्या हंगामाची तयारी करण्यासाठी बी-बियाणो व रासायनिक खतांची खरेदी करण्यासाठी, तसेच दैनंदिन आर्थिक गरजा भागविण्यासाठी शेतकर्‍यांना सध्या पैशांची आवश्यकता असल्याने शेतकरी हा शेतीमाल मोठय़ा प्रमाणावर विक्रीस आणत आहे. अशा परिस्थितीत चलन तुटवड्यामुळे लिलाव बंद राहिल्यास येथील शेतकर्‍यांची माल विक्रीची गैरसोय होत आहे. चलन पुरवठा सुरळीत सुरू न झाल्यामुळे शेतीमाल लिलावाबाबत अनिश्‍चितता निर्माण झालेली आहे.


यावर अधिक वाचा :