testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मुंबईकर, फूड अॅपवरून अन्न मागवतात, पण ते येते गलिच्छ झोपडपट्टीतून

Last Modified गुरूवार, 11 ऑक्टोबर 2018 (07:56 IST)
अगदी खरे आहे. तुम्ही जर ऑनलाईन अन्न मागवत असाल तर तो तुमच्या जीवाशी खेळ होतो आहे.
अॅपवरून मागवणारा आवडीचा पदार्थ किती घाणेरड्या ठिकाणी बनतोय, हे तुम्हाला कळलं तर किळस येणार आहे.
मुंबईत तब्बल ३४७ फुड आऊटलेट्सवर अन्न व औषध प्रशासनने (एफडीए) धाडी टाकल्या असून हे भीषण सत्य समोर आले आहे.
स्विगी, फूडपांडा, झोमॅटो यासारख्या फुड चैन कंपन्यांकडून पुरविण्यात येणारे अन्न अतिशय घाणेरड्या अवस्थेत तयार होत असल्याचे समोर आले आहे. तसेच
स्वस्त, झटपट आणि भरघोस डिस्काऊंटच्या नावाखाली ग्राहकांना अतिशय सुमार दर्जाचं अन्न पुरवत सर्वसामान्यांच्या आरोग्याशी खेळण्याचाच हा प्रकार असल्याचे दिसून येते आहे. मुंबईच्या बहुतांश झोपडपट्ट्यांमधून अतिशय घाणेरड्या ठिकाणी तयार केलेले अन्न मुंबईभर पुरवठा होत असल्याचे या धाडींच्या निमित्ताने समोर आले आहे.
२१ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या कालावधीत एफडीएच्या टीमने एकूण ३४७ धाडी टाकल्या असून त्यातील बहुतांश ठिकाणी अतिशय वाईट चित्र होते. धाडींमध्ये तर ११३ दुकानांकडे अन्नपदार्थ तयार करण्याचा परवाना नसल्याचे समोर आले असून, अन्न तयार करण्यासाठी कोणतीही परवाना नोंदणी केलेली नाही. गोरगाव, मालाड, अंधेरी, भांडुप, चेंबुर, प्रभादेवी आदी भागातून या कंपन्यांना अन्नाचे वितरण करण्यात येत होते. बहुतांश अन्न हे मुंबईतील झोपडपट्टीच्या परिसरातच तयार होत आहे. अन्न तयार करण्यात येणारे किचनचे ठिकाण हे अतिशय घाणेरडे असल्याचे धाडी घालणाऱ्या पथकाच्या निदर्शनास आले आहे.


यावर अधिक वाचा :

ऑडी ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन लॉन्च, कारमध्ये उपलब्ध होईल ...

national news
जर्मनीची लक्झरी कार निर्माता ऑडीने मंगळवारी, त्याची सेडान कार ए6 चा लाईफ स्टाइल अॅडिशन ...

जागतिक महिला दिन: पीएम मोदींचा नारी शक्तीला सलाम, पोस्ट ...

national news
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक महिला दिनच्या निमित्ताने महिलांना केले आणि शुभेच्छा ...

जागतिक महिला दिन विशेष : वाट खडतर... तरीही आज सक्षम मी

national news
बँकेतील अधिकारीपदावरील नोकरी व त्यानंतर चांगल्या घरात झालेल्या विवाह, असे सारे काही उत्तम ...

सेक्स लाईफसाठी वाईट आहे या 7 सवयी

national news
– खास करून महिला, आपल्या पार्टनरसोबत सेक्सबद्दल बोलताना टाळण्याचा प्रयत्न करतात. कारण ...

शरीरातील या 10 भागांवर तीळ, सांगतात धनयोगाबद्दल

national news
शरीरातील 10 स्थान असे आहे जेथे तीळ असायचा स्पष्ट अर्थ आहे की तुम्हाला कधीपण पैशांचा अभाव ...

अभिनेते परेश रावल निवडणूक लढवणार नाही

national news
भाजपाचे गुजरातमधील खासदार आणि अभिनेते परेश रावल यांनी लोकसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय ...

भाजपची ४१ स्टार प्रचारकांची यादी तयार

national news
राज्यात निवडणुकीत प्रचारासाठी भाजपाने ४१ स्टार प्रचारकांची यादी तयार केली आहे. मोठ्या ...

महाआघाडीचे जागावाटप जाहीर

national news
महाआघाडीच्या लोकसभेच्या जागांसाठीची घोषणा करण्यात आली आहे. काँग्रेस २४ जागांवर तर ...

कोहलीच्या रागाला घाबरतो ऋषभ पंत

national news
विकेटकीपर फलंदाज ऋषभ पंत म्हणाला की भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या रागाची त्याला भीती ...

विकासाचा ढोल बडवला, त्या दाभडीचाही विकास नाही, ...

national news
२०१४च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी #दाभडी गावातून देशभरातील शेतकऱ्यांच्या ...