Widgets Magazine

पाकिस्तानी गायिकेने गायले जोगावातले मराठी गाणे

nazia amin mohammad
मुंबई- संगीताचे सूर केवळ निखळ आनंदच देऊ शकतात. एकमेकांना प्रेमाने बांधून ठेवण्याची ताकद संगीतात असते. तेव्हा केवळ प्रेम पसरू दे, द्वेष नको, असे आवाहन करत पाकिस्ानात राहणार्‍या एका ‍गायिकेने चक्क मराठी गाणं गायले आहे.
जोगावा सिनेमातले जीव रंगला, दंगला असा हे गाणं तिच्या गोड आवाजात खरंच भाषेच्या, देशाच्या सीमा पुसून टाकते. मुळची यूएईची नागरिक असलेली आणि सध्या पाकिस्तानात कराचीत राहणारी गायिका नाझिया अमीन मोहम्मद हिने हे गाणं गायले आहे. तिच्या फेसबुक वॉलवर तिने ते पोस्ट केले आहे.

दोन्ही देशांत कायम तणावाचे राजकीय संबंध असतात. याची जाणीव दोन्ही देशातल्या नागरिकांना आहे.


यावर अधिक वाचा :