बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शुक्रवार, 16 जून 2017 (10:25 IST)

गैरसमज दूर करण्यासाठी निवडणूक लढवणारच

स्वर्ग आता केवळ दोन बोटेच राहिला आहे, असा समज काहींचा झाला असून अशा लोकांचा हा गैरसमज दूर करण्यासाठी आपण आगामी निवडणूक लढवणारच असल्याची घोषणा माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी केली. डॉ. कदम सांगलीत पत्रकारांशी बोलत होते. डॉ. कदम यांचा हा रोष भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या दिशेने होता. दरम्यान कर्जमाफीबाबत विरोधकांशीही चर्चा करण्याचे भाजपचे धोरण लोकशाहीत नक्कीच समाधानकारक आहे असेही डॉ. कदम यांनी यावेळी सांगितले. 
 
सध्या वाढत चाललेली भाजपची ताकद व पलुस कडेगाव मतदार संघातील पारंपरिक विरोधक देशमुख बंधू यांचे वाढते प्राबल्य यामुळे आगामी निवडणूक कदम कुटुबियांपैकी अन्य कोणी लढवली तर विरोधकांना ही निवडणूक सोपी जाईल अशी चर्चा सुरू आहे.  याबाबत बोलताना डॉ. कदम म्हणाले, आतापर्यंत अनेक उन्हाळे पावसाळे पाहीले आहेत. अनेक वादळं आली व गेली. सध्याची परिस्थिती पाहता आगामी निवडणूक मला लढवावीच लागेल. लोकसभा की विधानसभा हे मात्र ज्या त्या वेळी ठरवू असे स्पष्ट केले आहे.