Widgets Magazine
Widgets Magazine

राष्ट्रपतींमुळे आयुष्यात काय फरक पडतो : राज ठाकरे

राष्ट्रपती म्हणजे फक्त एक रबर स्टॅम्प असल्याचं वादग्रस्त वक्तव्य मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. ''राष्ट्रपती म्हणजे फक्त एक रबर स्टॅम्प असून त्यांचा देशाला कधीच फायदा झालेला नाही'', असं राज ठाकरे बोलले आहेत. राष्ट्रपती निवडीबाबत विचारलं असता राज ठाकरेंनी हे वक्तव्य केलं आहे. 
 
''याकूब मेमनला देण्यात आलेली फाशी एवढा एकच विषय मला आठवतो. अन्यथा राष्ट्रपतींचा तुमच्या आमच्या आयुष्यात काय फरक पडतो. राष्ट्रपतींनी त्यांची भूमिका म्हणून कधी बजावली आहे का ?  इतके विषय या देशात आहेत. केंद्र आणि राज्य सरकारकडून जी दडपशाही सुरु आहे, त्याबद्दल देशातील इतके नागरिक त्यांना मेल, पत्र पाठवतात. त्यांना कुठची उत्तरं मिळतात ?.  पुर्वींपासून जो शब्द वापरला जातो त्याप्रमाणे राष्ट्रपती म्हणजे रबर स्टॅम्पच आहे. ज्याचं सरकार त्याचा रबर स्टॅम्प म्हणजेच राष्ट्रपती'', असं राज ठाकरे बोलले आहेत. Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

निवळेच्या घटनेची न्यायालयीन चौकशी करा: विखे पाटील

मुंबई: निवळे येथील आंदोलनावर पोलिसांनी केलेल्या कारवाईची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी ...

news

पुण्यात भर रस्त्यात बिल्डरवर गोळीबार

पुणे - पिंपरी-चिंचवड येथील पिंपळे गुरवमध्ये शनिवारी सकाळी बिल्डरवर अज्ञातांनी गोळीबार ...

news

शहीद संदीप जाधव अनंतात विलीन

जम्मू कश्मीरमध्ये पाकच्या हल्ल्यात शहीद झालेल्या संदीप सर्जेराव जाधव यांच्यावर केळगाव ...

news

मक्का: घातपात घडवण्याच्या प्रयत्न उधळला

मक्कातील काबा येथील मशिदीला निशाणा करुन घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असणा-या एका ...

Widgets Magazine