Widgets Magazine
Widgets Magazine

पुण्याचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचे निधन

मंगळवार, 16 मे 2017 (11:49 IST)

navnath kamble

पुणे महापालिकेचे उपमहापौर नवनाथ कांबळे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे. मॉर्निंग वॉकसाठी निघाले असताना त्यांना सकाळीच हृदयविकाराचा झटका आला होता.
 
हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुबी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारादरम्यानच त्यांचं निधन झालं. काही महिन्यांपूर्वीच नवनाथ कांबळे यांनी उपमहापौर म्हणून पदभार स्विकारला होता. भाजपने पुण्यात एकहाती सत्ता मिळाल्यानंतर मित्रपक्ष आरपीआयला (आठवले गट) उपमहापौर दिलं. आरपीआयकडून उपमहापौर म्हणून नवनाथ कांबळे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. फेब्रुवारीमध्ये झालेल्या निवडणुकीत कांबळे कोरेगाव मतदार संघातून भाजपच्या चिन्हावर निवडून आले होते.Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

सीबीआयकडून चिदंबरम पिता - पुत्रांच्या घरावर छापा

काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम आणि त्यांचे पुत्र कार्ती ...

news

लालू प्रसाद यादव यांच्या २२ ठिकाणांवर आयकर छापे

बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांच्या 22 ...

news

मलेशियात 330 दुर्मिळ कासवे जप्त

क्वालालंपूर- मलेशियाच्या सीमाशुल्क विभागाने तस्करी करण्यात येत असलेली 330 दुर्मिळ कासवे ...

news

आयकर विभागाने लालू प्रसाद यांच्या 22 ठिकाणांवर छापे मारले

आयकर विभाग आज सकाळी 8.30 च्या पासून कारवाई करत असून राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू ...

Widgets Magazine