शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 7 नोव्हेंबर 2017 (12:28 IST)

'नोटबंदीवर' अशी आहे पुणेरी पाटी

सध्या एक पुणेरी पाटी चर्चेत आली आहे. नोटबंदीवर पुण्यात एक डिजिटल बोर्डाची पाटी तयार करण्यात आली आहे. नोटांच्या बंदीला होणारी वर्षपूर्ती येत्या बुधवारी होत आहे. ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा बंद करण्याच्या वर्षपर्तीच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांनी पाट्यांच्या माध्‍यमातून बंद करण्यात आलेल्या नोटांना अनोख्या पध्दतीने श्रध्दांजली वाहिली आहे.

पुणेकरांनी जुन्या नोटांचा फलक करून "तुमको ना भूल पाएंगे" या शब्दांत श्रद्धांजली वाहिली आहे. सिंहगड रस्त्यावर जुन्या नोटांसह हा फलक लावण्यात आला आहे. हा फलक लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.