testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

देवदर्शनासाठी गेलेल्या महिलेवर फॉर्चूनर गाडीमध्ये सामुहीक बलात्कार

उरुळी कांचन| Last Modified शनिवार, 17 जून 2017 (12:16 IST)
येथील जेजुरी मार्गावर शिंदवणे (ता. हवेली) घाटामध्ये काल शुक्रावार (दि.१६) रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका महिलेवर फॉर्चूनर गाडीमध्ये सामुहीक बलात्कारा केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिडीत महिला केडगाव परिसरातील असून ती देवदर्शनासाठी नारायणपूर येथे गेली होती. मात्र महिलेला घरी येण्यासाठी रात्री उशिर झाल्याने पारगाव चौफुला येथे गाडीसाठी उभी होती. यावेळी त्या ठिकाणी फॉर्चूनर गाडीतून आलेल्या दोन तरुणांनी शिंदवणे घाटामध्ये नेवून महिलेवर बलात्कार केला व नंतर घाटामध्येच सोडून
दिले.

दरम्यान, महिलेने घाटमधून प्रवास करणाऱ्या दोन दुचाकीस्वरांच्या मदतीने फॉर्चूनर गाडीचा नंबर मिळविला असूनलोणी काळभोर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

याप्रकरणी पोलिसांचा पुढील तपास चालू आहे.


यावर अधिक वाचा :