शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 11 एप्रिल 2017 (23:02 IST)

बनावट रेशनकार्ड बनवणारे रॅकेट पकडले

नाशिकमध्ये बेकायदेशीररीत्या बनावट उत्पन्नाचा दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड बनवून देणारे रॅकेट उघड झाले आहे. याप्रकरणी हरिचंद्र रामचंद्र अग्रवाल (५२) ला पोलिसांनी ताब्यात घेतले असून एकजण फरार आहे. यात सुमारे शंभर रेशनकार्ड कोरे आढळून आले. मुंबई येथील रेशनकार्डवरील नाव कमी केलेले दाखले, तसेच शाळा सोडल्याचे कोरे दाखले, उत्पन्नाचे दाखले, जन्म दाखले, नगरसेवकांचे लेटरहेड, विविध जिल्ह्यातील अधिकार्‍यांचे व कॅन्टोन्मेंट बोर्डाचे बनावट रबरी शिक्के पथकास आढळून आले. तर काही दाखल्यांवर बनावट स्वाक्षरी करून वितरीत केले असल्याचा प्राथमिक अंदाज अन्न व पुरवठा अधिकार्‍यांनी व्यक्त केला. सोबतच शहरातील कन्या कोठारी, रुंग्ठा शाळा, गांधीनगर येथील जनता विद्यालय तसेच परतूर आणि चाळीसगाव येथील काही शाळांचे दाखले, मुख्याध्यापकांचे शिक्केही आढळले. या दाखल्यांसह कोरे सात बारा उतारे सापडले. छाप्यात सर्व बनावट दाखले, रबरी शिक्के व रेशनकार्ड आदी जप्त करण्यात आले आहेत.