गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :नाशिक , सोमवार, 30 जानेवारी 2017 (13:47 IST)

बोटॅनिकल गार्डन प्रकल्प भविष्यात उदाहरण बनेल - रतन टाटा

बोटॅनिकल गार्डन प्रकल्प चांगला असून कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारीनुसार टाटा ट्रस्टने समाजाला निसर्गाच्या जवळ आणण्याचा एक चांगला प्रयत्न केला आहे.  भविष्यात हा प्रकल्प एक उदाहरण म्हणून समोर येईल. असे गौरव उद्गार रतन टाटा यांनी काढले आहेत.त्यांनी राज ठाकरे यांच्या नाशिक मधील सर्व कामांचे कौतुक केले आहे.
 
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कल्पनेतून  महाराष्ट्रातील असलेले एकमेव  नाशिकमधील बोटॅनिकल गार्डनमध्ये सध्या सगळेच पाहणी करत आहेत. आज थेट ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी भेट दिली आहे.टाटा समूहाच्या सहय्याने तर राज यांच्या कल्पनेतून हा प्रकल्प साकार झाला आहे.उद्योगपती रतन टाटा हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासोबत बोटॅनिकल गार्डनमध्ये दाखल झाले.