Widgets Magazine

स्वाभिमानी सदाभाऊ खोत यांना जाब विचारणार

sadabhau khot
पक्षविरोधी भुमिका घेतल्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना कृषी राज्य मंत्री यांना जाब विचारणार आहे. यासाठी
एका समितीची स्थापना केली असून, या समितीसमोर सदाभाउंना बाजू मांडण्यासाठी ४ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर सदाभाऊ यांचा फैसला होणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी दिले.

स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमधे राहणार की नाही याबाबत २५ जुलैनंतर निर्णय घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सदाभाऊ
खोत यांची भूमिका येथून पुढे स्वाभिमानीची अधिकृत मानली जाणार नाही. खासदार राजू शेट्टी आणि प्रदेशाध्यक्ष डॉ. प्रकाश पोफळे हेच स्वाभिमानीची अधिकृत भुमिका मांडतील.’’ असे स्पष्ट करण्यात आले आहे.


यावर अधिक वाचा :