गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

बीईंग ह्युमनला बीएमसीने ब्लॅकलिस्टमध्ये टाकले

अभिनेता सलमान खानची सामाजिक संस्था (एनजीओ) बीईंग ह्युमन अनेक सामाजिक कामांत सहकार्य करते. मात्र, हीच सामाजिक संस्था आता अडचणतीत येण्याची शक्यता आहे. सामाजिक संस्था बीईंग ह्युमनने २०१६ साली बीएमसीसोबत मिळून डायलिसिस सेंटर उभारण्याची घोषणा केली होती. प्रत्यक्षात मात्र, या संस्थेकडून अद्याप डायलिसिस केंद्र उभारण्यास सुरुवात झालेली नाहीये. त्यामुळेच मुंबई महानगरपालिकेने याविरोधात कारवाई केली आहे.
 
डायलिसिस सेंटरच्या कामास जवळपास दोन वर्षांनंतरही सुरुवात न झाल्याने बीएमसीने या संस्थेला काळ्या यादीत (ब्लॅकलिस्ट) टाकलं आहे.  २०१६ साली बीएमसीने पब्लिक-प्रायव्हेट पार्टनरशिप (पीपीपी) अंतर्गत १२ डायलिसिस सेंटर सुरु करण्याची योजना आखली होती. या दरम्यान बीएमसीने जवळपास ३५० रुपये उपचाराची फी ठेवली होती.
 
सलमानच्या एनजीओने ३३९.५० रुपयांत डायलिसिस सुविधा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्णय घेतला होता. यामध्ये वांद्रे येथे २४ डायलिसिस मशिन्स लावण्याचं म्हटलं होतं. तर काही महत्वाच्या गरजा पुर्ण करण्यासाठी सिविक बॉडीला अपयश आलं. त्यामुळे मनपातर्फे या सर्व गोष्टींची लवकरात लवकर पूर्ण व्हावी असं बीईंग ह्युमनला वाटतं.