testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जुलैत राजकीय भूकंप तर मध्यावधीची शक्यता – खा.संजय राऊत

sanjay raut
Last Modified शनिवार, 10 जून 2017 (16:40 IST)

शिवसेनने आपली सरकारवर नाराजी उघड केली आहे. ज्या सरकारला शेतकरी वर्गाची किंमत नाही ते सरकार काय कामाचे, शेतकारी आत्महत्या करत आहे. गेल्या वर्षात सुमारे साडेचार शेतकरयानी आत्महत्या केल्या आहेत.तरही सरकार शेतकरी वर्गाला कर्ज मुक्ती देत नाही.आज कांदे फेकतोय उद्या भाजपाला फेकू असे म्हणत जुलै महिन्यात शिवसेना भूकंप करण्याच्या तयारीत आहे असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीवरून आता शिवसेना आणि भाजप यांच्यात जुंपणार आहे. त्याचेच संकेत संजय राऊत यांनी आज नाशिकमध्ये दिले आहेत. शिवसेनेच्या संपर्क अभियानात ते बोलत होते.त्यांनी सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.शिवसेनेनेही मध्यावधी निवडणूकांसाठी सज्ज असल्याचे संकेत आज दिले आहेत.तसे अप्रत्यक्ष पणे संजय राऊत यांनी म्हटले आहे. जुलैमध्ये राजकीय भूकंप होणार असल्याचे सुतोवाच करून मध्यावधी निवडणूकांना शिवसेना सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत.समृद्धी महामार्ग कोणत्याही स्थितीत होऊ देणार नसल्याचा उद्धव ठाकरे यांचा शब्द असल्याचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.यावर अधिक वाचा :