testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

त्याने बायकोला चक्क विकले, लावून दिला दुसरा विवाह

Last Modified सोमवार, 9 ऑक्टोबर 2017 (11:10 IST)

धक्का दायक प्रकार उघड झाला आहे. अय्याशी करण्यसाठी एका इसमाने चक्क बायकोचा सौदा केला आहे. त्याने आपल्या बायकोला चक्क विकले आहे. तिच्यावर दबाव आणत सर्व प्रकार त्याने केला आहे. यामध्ये

यामध्ये पती हा कोणतीही नोकरी धंदा करत नव्हता शेवटी पैसा पाहिजे म्हणून त्याने आपल्या पत्नीला अय्याशी करण्यसाठी लाखभर रुपयांना विकले होते आणि तिचा विवाह लाऊन दिला होता.

सविस्तर वृत्त असे की, महिलेने नाशिक येथील
इंदिरानगर येथे फिर्याद दिली आहे. यामध्ये प्रमुख संशयित नवरा
अमोल भालेराव या सोबत पिडीत महिलेचा विवाह झाला होता. मात्र अमोल हा काम धंदा न करता शोर्ट कट ने पैसा कसा मिळवता येईल हे पाहत असे. यामुळे पत्नी वैतगली होती. यामध्ये अमोलला पुन्हा पैशाची गरज होती.या साठी त्याने पत्नीला आधी सुरत येथे नेले आणि ललिता भालेराव, नणंद मयुरी हरीश उघाडे यांचेसह मयुरीचा मित्र नितीन सारवान, मेघा सोलंकी व गोपाळ सोलंकी यांच्या सोबत सल्ला मसलत करत त्याने पत्नीला राजस्थान येथे नेले.महिलेचे नातेवाईक आहेत हे भासवून आणि बनाव करत भालेराव याने यामध्ये जैन भवन येथे नाटक
रचत बायकोला लग्नासाठी इच्छुक दाखवत त्याने विशाल जैन या युवकाला तिला दाखवले होते. बनाव करत तिच्यावर दबाव आणून तिचा विवाह लावला होता. तिच्या बदल्यात त्याने जवळपास दोन लाख रुपये घेतले होते. तोपर्यंत जैन यांना महिलेने सर्व प्रकार सांगितला आहे.

यामध्ये तक्रारदार महिलेने इंदिरानगर पोलीस ठाण्यात अमोल भालेराव, ललिता भालेराव, मुयरी भालेराव, नितीन सारवान, मेघा सोलंकी, गोपाळ सोळंकी यांचे विरोधात फिर्यादीची दिली असून महिला विक्री केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यावर अधिक वाचा :