शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 1 मार्च 2017 (16:52 IST)

निधी उपलब्ध होत नसल्याने सेल्फी पॉईंट बंद

मुंबईतील शिवाजीपार्क येथील कॉलेज तरुण-तरुणींच्या आकर्षणाचे केंद्र ठरलेला सेल्फी पॉईंट अखेर बंद झाल आहे. महापालिका निवडणुकीतल्या पराभवानंतर मनसेचे माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांनी शिवाजी पार्कातील सेल्फी पॉईंट बंद केला आहे. मुंबईतल्या या पहिल्या सेल्फी पाँईंटला तरुणाईचा उत्फुर्त प्रतिसाद मिळत होता. पण देखभालीसाठी सीएसआर फंड उपलब्ध होणं कठीण असल्यानं हा सेल्फी पॉईंट बंद केल्याचं मनसेच्या वतीनं सांगण्यात आलं आहे. मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे हे शिवाजी पार्क भागात नगरसेवक असताना सेल्फी पॉईंट सुरु करण्यात आला होता. मुंबईतील पहिलाच अशाप्रकारचा सेल्फी पॉईंट असल्याने तरुणांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. मात्र, यावेळी संदीप देशपांडेच्या पत्नी स्वप्ना देशपांडे या शिवाजी पार्कातून नगरसेवकपदासाठी उभ्या होत्या. मात्र, शिवसेनेच्या विशाखा राऊत यांनी त्यांचा पराभव केला. त्यांनंतर अगदी काही दिवसातच संदीप देशपांडे यांनी देखभालीसाठी निधी उपलब्ध होत नसल्याचं कारण देत सेल्फी पॉईंट बंद केला आहे.