शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

युतीचा निर्णय लवकर घ्या, उद्धव यांचा भाजपला अल्टिमेटम

राज्य सरकाराने मानापमानावरून एकमेकांविरोधात टीकासूर लावणार्‍या सत्ताधारी भाजप- शिवसेना यांच्यात मुंबई महापालिका निवडणुकीत युती होईल की नाही, अशी सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. असे असतानाच युतीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपला अल्टिमेटम दिला आहे. मुंबई महापालिका निवडणूक होण्याआधी युतीचा निर्णय घ्या, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.
 
तसेच आगामी निवडणुकीत शिवसेनेशी कटुता न घेता युती करण्याची भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. 26 जिल्हा परिषद, 10 महापालिकामध्ये निवडणुकांच्या घोषणेआधी रणनीती ठरवण्यासाठी झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी हे संकेत दिलेत. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर रात्री उशिरापर्यंत भाजपची मॅरेथॉन बैठक झाली. यावेळी भाजपने संघटनमंत्री आणि जिल्ह्याची जबाबदारी असलेले पालकमंत्री सहभागी झाले होते. यामध्ये शिवसेनेशी सकारात्मक भूमिका म्हणजेच कटुत ना घेता युती करावी, अशी भूमिका फडणवीस यांनी मांडली आहे.