शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

लोकहिताचे निर्णय घेण्यात कायम अग्रेसर असणारा नेता

पतंगराव यांना श्रद्धांजली वाहण्याची वेळ येईल, असे कधी वाटले नव्हते. त्यांच्या संपूर्ण जीवनात त्यांना प्रचंड संघर्ष करावा लागला. पण त्यांनी जय-पराजय याचा कधीच विचार केला नाही. ते केवळ लढत राहिले. मी असे अनेक क्षण मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाहिले, जिथे पतंगराव कदम यांनी लोकांच्या हिताचे निर्णय घेण्यास हट्ट केला. लोकहिताचे निर्णय घेण्यात कायम अग्रेसर असणारा असा हा नेता होता, अशा शब्दात विधिमंडळ गटनेते आ. जयंत पाटील  यांनी स्व. पतंगराव कदम यांना श्रद्धांजली वाहिली. पतंगराव यांच्या शोक प्रस्तावावर विधानसभेत ते बोलत होते.
 
ते पुढे म्हणाले की सामाजिक काम कसे करावे, याचे उत्तम उदाहरण म्हणजे पतंगराव कदम! ते कोणालाही घाबरत नसत आणि मनात जे आहे, ते बोलत असत. नवे नेतृत्व जर समोर येत असेल, तर त्याला प्रोत्साहन देण्याचे काम पतंगराव कदम करायचे. त्यांना पाण्याचा प्रश्न महत्त्वाचा होता. त्यांच्या मतदारसंघात पाणी योग्य मिळते की नाही याकडे त्यांचे लक्ष असायचे. अशा या लढवय्या नेत्याला मी माझ्यातर्फे आणि पक्षातर्फे श्रद्धांजली वाहतो.
 
पतंगराव कदम यांचे निधन कर्करोगामुळे झाले. या आधी आबांचे कर्करोगामुळे निधन झाले होते. त्यामुळे आपल्या सेवनात काय येत आहे, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. तसेच, सरकारने पिकांवर फवारल्या जाणार औषधांवरही मर्यादा घालावी. काही कायदा करता येतो का ते पहावे. हीच खरी या दोघांना श्रध्दांजली ठरेल, असेही ते म्हणाले.