testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

श्री साई पादुका दर्शन सोहळा 25 देशांमध्ये

saibaba
Last Modified शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (11:46 IST)

शिर्डी येथील श्री साईबाबा यांच्या समाधीस 18 ऑक्‍टोबर 2018 या दिवशी 100 वर्षे पूर्ण होत आहेत. साई इतिहासातल्या या महत्वपूर्ण घटनेचे मोल साई संस्थान आणि विश्‍वभरातले साईभक्त यांच्यासाठी अनन्यसाधारण असे आहे. साहजिकच या घटनेचा हा शतकी टप्पा संस्मरणीय पध्दतीने साजरा होण्यासाठी 1 ऑक्‍टोबर 2017 ते 18 ऑक्‍टोबर 2018 हा कालावधी श्री साईबाबा समाधी शताब्दी वर्ष म्हणून साजरा करण्याचे संस्थान व्यवस्थापनाने निश्‍चित केले आहे. या महत्त्वपूर्ण कालावधीचे गांभिर्य जाणून उत्तमोत्तम व दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे संस्थान व्यवस्थापनाने ठरविले आहे.

शताब्दी वर्षाच्या निमित्ताने विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणून साईबाबा संस्थानच्या वतीने श्री साई पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यासह संपूर्ण देशभरातील प्रत्येक राज्यातील विविध शहरांमध्ये व जगातील 25 देशांमध्ये तेथील साई मंदिरांमार्फत करण्यात येणार आहे. अनेक साईभक्‍तांनी एकत्र येऊन भारतातील विविध ठिकाणी श्री साई मंदिरांची उभारणी केली आहे. या मंदिरांच्या माध्यमातून श्री साई पादुका दर्शन सोहळ्याचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्याचा मानस अनेकांनी व्यक्त केला आहे जेणेकरून शहरातील साईभक्‍तांना श्री साईबाबांच्या पादुकांच्या दर्शनाचा लाभ घेता येईल. अशा प्रकारचा कार्यक्रम आयोजित करू इच्छित असलेल्या ट्रस्टने संस्थानशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ. सुरेश हावरे यांनी केले आहे.यावर अधिक वाचा :