testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

'बेटी बचाव बेटी पढ़ाओ' साठी जांगड़ा धावले नाशिक ते शिर्डी

subhash jangada
Last Modified शनिवार, 2 डिसेंबर 2017 (17:19 IST)

बेटी बचाव,
बेटी पढाओचा संदेश देण्यासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सेक्रेटरी सुभाष जांगडा यांनी आज (दि.२ डिसेंबर)
नाशिक ते शिर्डी हे ९० कोलोमीटरचे अंतर धावत पूर्ण केले. आज सकाळी पहाटे ४ वाजता नाशिकच्या गोल्फ क्लब मैदान येथून त्यांनी धावायला सुरुवात केली त्यानंतर दुपारी ३.३० वाजेच्या सुमारास ते एकूण ११ तास ३० मिनिटे सलग धावत शिर्डी येथे पोहचले. त्यानंतर त्यांनी श्री.साई बाबा यांचे दर्शन घेऊन समाजात मुलींना मानाचे स्थान मिळावे
स्त्री भृन हत्या थांबावी
,
तसेच त्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी साईचरणी साकडे घातले. त्यांच्या या उपक्रमासाठी नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे नवनीर्वाचित अध्यक्ष जयपाल शर्मा व वरिष्ट उपाध्यक्ष राजेंद्र फड़ हे विशेष सहकार्य लाभले.

समाजातील विघातक प्रथांमुळे आज मुलीची संख्या कमी होत असून ही बाब चिंताजनक आहे. त्यामुळे मुलींची भृन अवस्थेत हत्या न होता. त्यांना जीवन जगण्याचा अधिकार मिळावा तसेच त्यांना चांगले शिक्षण देऊन त्यांना अधिक सक्षम बनविण्यासाठी बेटी बचाव,
बेटी पढाओचा संदेश देण्यासाठी आज नाशिक ते शिर्डी धावलो असून यापुढीलही काळात यासाठी प्रयत्न सुरु राहतील अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी व्यक्त केली.


प्रारंभी त्यांचे सिन्नर,
पांगरी व त्यानंतर शिर्डी येथील नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. याठिकाणी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. या प्रसंगी शिर्डी येथे शिर्डी संस्थान चे ट्रस्टी सचिन तांबे यांनी स्वागत केले. तर सिन्नर व पांगरी येथे मुकेश चव्हाणके,
राजेंद्र रायजादे,
डॉ.संदीप मोरे,
राहाभाऊ लोणारी,
महेंद्र कानडी,
सुदाम लोंढे,
सुरजराम आदीनी त्यांचे शहरात स्वागत केले.

यावेळी त्यांच्या सोबत नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जयपाल शर्मा,
वरिष्ठ उपाध्यक्ष राजेंद्र फड,
राजेश चौधरी,
प्रदीप गुप्ता,
सुनील हिरे,
भरतभाई पटेल,
राहुल जांगडा,
संजू राठी,
नरेश चौधरी,

गणेश चौधरी आदी सहभागी झाले होते.

सुभाष जांगडा यांचा परिचय

सुभाष जांगड़ा हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असून कोलकत्ता रोडवेजचे ते भागीदार आहे. गेल्या दोन वर्षापासून ते नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे सेक्रेटरी म्हणून काम पाहत आहे. नाशिक ट्रान्सपोर्ट असोसिएशन कडून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक कार्यात त्यांचा मोलाचा वाटा असतो. ते स्वत: देखील सामाजिक बांधीलकीतुन नेहमी समाज उपयोगी वेगळे कार्यक्रम
राबवित असतात. ते गोल्फ क्लब नाशिकचे सदस्य आहे.यावर अधिक वाचा :