testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पुस्तकं माणसाचं आयुष्य समृद्ध करतात- सुधीर मुनगंटीवार

sudhir manguntiwar
Last Modified गुरूवार, 1 डिसेंबर 2016 (14:03 IST)
एक हजाराची नोट खर्च केली तर आपल्याजवळ काहीच राहात नाही परंतू एक पुस्तक वाचून ते दुस-याला दिले तर त्यातील ज्ञान आपल्या सोबत राहाते, पुस्तकांनी माणसाचं आयुष्य अधिक समृद्ध होत जाते, असे प्रतिपादन अर्थमंत्री यांनी केले.
मुंबईत संपन्न झालेल्या १४ व्या रेमंड क्रॉसवर्ड बूक पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ कवी गुलजार, शेखर गुप्ता, श्रीमती अनुपमा चोप्रा, ट्विंकल खन्ना, यांच्यासह क्रॉसवर्ड बूक समूहाशी संबंधित व इतर मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते हेल्थ अॅण्ड फिटनेस गटातील पुरस्कार श्रीमती पायल गिडवानी यांना त्यांच्या “बॉडी गॉडेसेस, द कंपलिट गाईड ऑन योगा फॉर विमेन” या पुस्तकासाठी प्रदान करण्यात आला. वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते यावेळी मेधा देशमुख- भास्करन यांनी लिहिलेल्या शिवाजी महाराजांवरील पुस्तकाचे प्रकाशन ही करण्यात आले. कार्यक्रमात गुलजार यांच्या हस्ते रुसकीन बॉण्ड यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला तर विविध १० गटांमध्ये हे पुरस्कार वितरित करण्यात आले.


यावर अधिक वाचा :