Widgets Magazine
Widgets Magazine

आर्टीलरी सेंटरमध्ये रॉय मॅथ्यू या जवानानं आत्महत्या केली

शुक्रवार, 3 मार्च 2017 (17:03 IST)

नाशिकमधल्या आर्टीलरी सेंटरमध्ये रॉय मॅथ्यू या जवानानं आत्महत्या केली आहे. गेल्या २५ तारखेपासून बेपत्ता असलेल्या मॅथ्यूचा गळफास घेतलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत बराकमध्ये मिळून आला. काही दिवसांपूर्वी एका वेबसाईटच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मॅथ्यूनं या पिळवणुकीबद्दल तक्रार केली होती. याच घटनेनंतर तणावात असलेल्या मॅथ्यूनं आत्महत्या केल्याचं उघड झाले आहे.अधिकाऱ्यांकडून पिळवणूक होत असल्याचा आरोप काही जवानांनी केला होता.लष्कराच्या 13 वर्षांच्या सेवेत मी फक्त अधिकाऱ्यांची कुत्री, मुलं सांभाळली असं मॅथ्यू म्हणाला होता. हा व्हिडीओ न्यूज चॅनेलच्या वेबसाईटवर आल्यानंतर अधिकाऱ्यांकडून त्याला टॉर्चर केल्याने, तणावात असलेल्या मॅथ्यूनं आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.
 
गनर असलेला मॅथ्यू 13 वर्षापासून आर्टीलरीतल्या कर्नल दर्जाच्या अधिकाऱ्यांचा बडी म्हणून काम करत होता.  24 फेब्रुवारीला व्हिडीओ आला आणि याच तणावात असलेल्या मॅथ्यूने 25 तारखेला घरच्यांशी शेवटचं बोलणं केलं आणि आत्महत्या केल्याचं सांगण्यात येत आहे.डीएस रॉय मॅथ्यू हा भारतीय लष्कराच्या तोफखाना विभागात अर्थात आर्टिलरीत गनर या पोस्टवर होता. 
 Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

महाराष्ट्र न्यूज

news

लोणार सरोवर परिसरात लोणार पर्यटन महोत्सवाचे आयोजन

जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या लोणार सरोवर परिसरात लोणार पर्यटन महोत्सवाचे आयोजन ...

news

सेल्फी चा तिढा पालिकेने सोडवला तिन्ही पक्षाना परवानगी

दादरमधील सेल्फी पाँईट वादावर अखेर मुंबई महापालिकेनेच चांगलाच तोडगा काढला आहे. मनसे, भाजप ...

news

शिक्षणमंत्र्यांची भूमिका विद्यार्थीविरोधी -राष्ट्रवादी

सोलापूर येथील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज बंद पडण्याच्या मार्गावर असून आपल्या शिक्षणाचे ...

news

मुंबईत आता काँग्रेस महापौर उमेदवार देणार

काँग्रेस मुंबईत शिवसेनेला मदत करण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबई महापौरपदाच्या ...

Widgets Magazine