Widgets Magazine

प. पु. महंत श्री सुकेणेकर बाबा यांचे निधन

sukenakae
Last Modified बुधवार, 29 मार्च 2017 (21:37 IST)
नाशिक जिल्ह्यातील श्री क्षेत्र मौजे सुकेणे येथील दत्त मंदिराचे आधार स्तंभ प. पु. महंत श्री सुकेणेकर बाबा (१०५) यांचे बुधवारी पहाटे
निधन झाले. महंत सुकेणेकरबाबा या नावाने ते देशभरातील महानुभाव पंथात प्रसिध्द होते. नाशिकसह राज्यभरातील महानुभावपंथीय मंदिरे, आश्रम यांच्या उभारणीत व पंथीय साहित्य प्रसार व प्रचारात त्यांचे मोठे योगदान होते. राज्यासह
पंजाब, मुंबई, गुजरात या भागात सुकेणेकर बाबांचा शिष्य परीवार आहे. गेल्या दिड वर्षांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांच्या निधनाने महानुभाव पंथावर शोककळा पसरली आहे.


यावर अधिक वाचा :