testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

उन्हाळा भयानक आहे मात्र उष्मा लहरी नाहीत

summer
Last Modified सोमवार, 27 मार्च 2017 (20:30 IST)
राज्यात तपमान वाढत असून आज अकोला येथे ४३ तर
मालेगाव येथे ४२ डिग्री तपमान नोंदवले गेले आहे. तर इतर ठिकाणी ४० डिग्री तपमान नोंदवले गेले.त्यामुळे उन्हाळा भयानक आहे. मात्र अजून तरी उष्मा लहरी मात्र एप्रिल आणि मे महिना हा हीट वेव घेवून येईल असे मत पुणे वेध शाळेने नोंदवले आहे.अकोला सर्वाधिक 43.1 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. जळगाव, मालेगाव, नाशिक, सांगली आणि सोलापूरमध्येही पारा 40 अंशाच्या पुढं गेला आहे. त्यामुळ चिंता वाढली आहे.
अनेक ठिकाणी आणि जिल्हा परिसरात सामान्य तापमान 40 अंश सेल्सिअस असतं, तिथल्या तापमानात साडेचार ते साडेसहा अंश सेल्सिअसची वाढ झाली, तर त्यालाच तांत्रिकदृष्ट्या हिट वेव्ह म्हणता येतं. त्यामुळे राज्यातल्या तापमानाला हिट वेव्ह म्हणता येणार नाही, असे पुणे वेधशाळेने स्पष्ट केले आहे.
विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात एखाद-दोन ठिकाणी हीट वेव्ह सारखी परिस्थिती आहे.पुणे वेधशाळेच्या अंदाजानुसार, केरळ, तमिळनाडू, ईशान्य भारत, बिहार, उत्तर प्रदेशात हलक्या पावसाची चिन्ह आहे.


यावर अधिक वाचा :