testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

महाराष्ट्र तापला

Last Modified सोमवार, 27 मार्च 2017 (11:18 IST)
राज्यातील निम्म्या भागात पारा चाळिशीपार गेला आहे. रविवारी राज्यातील तब्बल ११ महानगरांतील तापमान ४० अंश सेल्सिअसपेक्षा अधिक होते तर उर्वरित शहरांचे तापमानही ४० पेक्षा केवळ एक-दोन अंशाने कमी नोंदविले
गेले. त्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवाची काहिली होत आहे.राज्यात सर्वाधिक कमाल तापमान अकोला येथे ४२़८ अंश सेल्सिअस नोंदले गेले. विदर्भ अधिक तापला आहे. तेथील बहुतांश ठिकाणचे कमाल तापमान ४०च्या पुढे गेले आहे़ जळगाव, मालेगाव, नाशिक, सांगली, सोलापूर येथील कमाल तापमानाने चाळिशी पार केली़ मराठवाड्याच्या काही भागांत किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे़

प्रमुख शहरांतील तापमान : भिरा (रायगड) ४३, सोलापूर ४०.८, अकोला ४२, अमरावती ४१.२, ब्रह्मपुरी ४१, चंद्रपूर ४२.२, गोंदिया ४१, वर्धा ४२, यवतमाळ ४०, मालेगाव ४१.८, जळगाव ४०.४, नाशिक ३८.४, औरंगाबाद ३८.७, परभणी ३९.९, उस्मानाबाद ३८.९, पुणे ३८.३, कोल्हापूर ३८.२, सांगली ३८.३, सातारा ३८.८, बुलडाणा ३८.७.


यावर अधिक वाचा :