testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

नाणार प्रकल्पाविरोधात काढलेल्या मोर्चाला परवानगी का नाकारली? – सुनिल तटकरे

sunil tatkare
Last Modified गुरूवार, 12 जुलै 2018 (16:35 IST)
नाणार हा कोकणातील वातावरणाला छेद देणारा प्रकल्प आहे. कोकणातील जनतेच्या दृष्टीने नाणारचा प्रकल्प अतिशय महत्त्वाचा आहे. त्यांची एक भावनिक बाजू आहे. त्यांनी काल काढलेल्या मोर्चाला परवानगी का नाकारण्यात आली?, असा संतप्त सवाल आ. सुनिल तटकरे यांनी सरकारला विचारला. तसेच सरकारने हा विषय गांभीर्याने घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली.
सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पासाठीचे नोटिफिकेशन रद्द करण्याची घोषणा कोकणवासीयांसमोर केली होता. मुख्यमंत्री म्हणतात की ही त्यांची वैयक्तिक भूमिका आहे. कॅबिनेट मंत्र्यांची भूमिका वैयक्तिक कशी असू शकते? राज्य सरकार रुल ऑफ डुईंग बिझनेस अनुसार चालणार आहे की नाही? असा सवाल त्यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी एक बाब स्पष्ट केली की नाणारविषयी सुभाष देसाईंचा अभ्यास झाला आहे पण सरकारचा झालेला नाही. ही सरकारमधील विसंगती आहे, अशी टीका त्यांनी केली. कोकणवासीयांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. हे सरकार टेकू असलेले सरकार आहे, त्यामुळेच हे घडत असल्याचे वक्तव्य त्यांनी केले.
सत्ताधारी पक्षातील आमदार राजदंड उचलतात. हे महाराष्ट्रात कधी घडले नव्हते. विरोधी पक्षातील लोकांनी हे केलं असतं तर सदस्याला बडतर्फ करण्याची भूमिका घेतली गेली असती. पण काल खालच्या सभागृहात सदस्यांनी जे केलं त्यावर काहीच कारवाई केली गेली नाही असा आरोप तटकरे यांनी केला.

नाणारप्रकरणी आज विधानपरिषदेमध्ये राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक असल्याचे चित्र पाहायला मिळाले. नाणारप्रकरणी आमदार सुनिल तटकरे यांनी स्थगन प्रस्ताव मांडल्यानंतर तो प्रस्ताव सभापतींनी फेटाळला त्यामुळे राष्ट्रवादीचे आमदार आक्रमक झाले. त्यामुळे काही मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकुब करण्यात आले मात्र त्यानंतर कामकाजाला सुरुवात झाल्यानंतरही नाणारप्रकल्पाबाबत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस व घटक पक्षांच्या आमदारांनी वेलमध्ये उतरुन गोंधळ घातला. त्यामुळे विधानपरिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आले.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

नारायण राणे आत्मचरीत्र लिहित आहेत

national news
“माझे मार्गदर्शक आणि वडील नारायण राणे हे आत्मचरीत्र लिहित असून लवकरच त्याचे प्रकाशन होईल. ...

आमचा पाठींबा युतीला नाही - मराठा क्रांती मोर्चा ठाणे

national news
ठाणे येथे मराठा क्रांती मोर्चाने लोकसभा मतदारसंघात शिवसेना-भाजप युतीला पाठिंबा नाही दिला ...

अक्षय कुमार सोबत मोदींची 'मन की बात' : ममता दीदी मला ...

national news
'विरोधकांमध्येही आपल्याला अनेक चांगले मित्र आहेत,' असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ...

सार्वजनिक शौचालयापेक्षा जास्त घाण असते ATM मशीन, होऊ शकतात ...

national news
वर्तमानात एटिएम मशीन ही प्रत्येकाची गरज आहे. दररोज लाखो लोक ATM मशीनीतून पैसे काढतात ...

विसरला नाही एक देखील आऊट

national news
सर्वांचा लाडका सचिन तेंडुलकर यांना त्यांचे चाहते त्यांच्या सर्वोत्तम खेळ आणि ...