testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

पोलीस अधिका-याचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू

Last Modified गुरूवार, 13 जुलै 2017 (08:53 IST)
मुंबई पोलीस दलातील एका वरिष्ठ अधिका-याचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. सहाय्यक पोलीस आयुक्त पदावर कार्यरत असणा-या दिलीप शिंदे यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. ते वाहतूक विभागात कार्यरत होते.

दिलीप शिंदे यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने पोलीस दलातील त्यांच्या सहका-यांना धक्का बसला आहे. स्वाईन फ्लू झाल्यामुळे त्यांना होली फॅमिली रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मंगळवारी संध्याकाळी उपचार सुरु असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप शिंदे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील होते. 1987 मध्ये पोलीस उपनिरीक्षक म्हणून त्यांनी कामास सुरुवात केली होती. सांताक्रूझ, माहित आणि धारावी या पोलीस स्थानकात त्यांनी काम केले होते.


यावर अधिक वाचा :