रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 14 ऑगस्ट 2021 (08:16 IST)

आठ लाखाच्या लाच प्रकरणातील आरोपी शिक्षणाधिकारी डॅा. वैशाली वीर यांना एक दिवसाची पोलीस कोठडी

तब्बल ८ लाख रुपयांची लाच घेतल्या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी डॅा. वैशाली वीर-झनकर यांना  न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी दिली आहे.आज परत त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. मंगळवारी ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात सापडल्यानंतर त्या दोन दिवसापासून फरार होत्या.पण,आज पोलिसांनी त्यांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर उभे केले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी वैशाली वीर यांच्यासह दोन जणांवर लाच प्रकरणी कारवाई केली होती.पण,महिलाअसल्याने सुर्यास्तानंतर अटक करता येत नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने समन्स बजावत वैशाली वीर यांना दिराच्या ताब्यात दिले होते. बुधवारी सकाळी आठ वाजता त्यांना भद्रकाली पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे आदेश दिले होते, पण त्या हजर राहिल्या नाही. त्यानंतर न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्या फरार झाल्याचे न्यायालयात सांगितले. पण, या प्रकरणातील वाहनचालक ज्ञानेश्वर येवले आणि शिक्षक पंकज दशपुते या दोघांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यानंतर न्यायालाने या दोघांना दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली होती. त्यानंतर आता वीर यांना अटक केल्यानंतर न्यायालयात उभे केल्यानंतर त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

नाशिक शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी डॅा. वैशाली पंकज वीर- झनकर यांच्यासह तीन जण ८ लखाची लाच घेतांना मंगळवारी सापळ्यात अडकले. ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली.या पथकाला नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहकार्य केले. या प्रकरणात तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २० टक्के अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबतचा कार्यादेश काढून देण्याकरिता लाच प्रकरणातील आरोपी पंकज रमेश दशपुते (राजेवाडी येथील प्राथमिक शिक्षक) यांनी आरोपी वैशाली वीर- झनकर यांचे करिता नऊ लाख रुपयाची मागणी केली. त्यांनंतर दिनांक २७ जुलै २०२१ रोजी वीर यांची पडताळणी केली असता त्यांनी सादर कामाकरिता तडजोडी अंती आठ लाख स्वीकारल्याचे मान्य करून लाचेचा पुढील व्यवहार त्यांचे चालक आरोपी क्रमांक ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले. सोबत करण्या बाबत सांगितले. त्यांनंतर १० ऑगस्ट रोजी येवले यांनी वीर यांचे करीत तक्रारदार यांचे कडून ८ लाख रूपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले.
 
युनिट – ठाणे *तक्रारदार- पुरुष वय ४५वर्षे आरोपी- १) श्रीमती वैशाली पंकज विर, वय -४४ वर्षे, शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद, नाशिक.२)ज्ञानेश्वर सूर्यकांत येवले.शासकीय वाहक चालक.३) पंकज रमेश दशपुते,प्राथमिक शिक्षक जि. प. शाळा राजेवाडी त.नाशिक. *लाचेची मागणी-* ९,००,०००/- रुपये *लाच स्विकारली* तडजोड अंती रु.८,००,०००/- *हस्तगत रक्कम-* ८,००,०००/-रुपये. *लाचेची मागणी -* ता.०६/०७/२०२१, २७/०७/२०२१ *लाच स्विकारली -*दि.१०/०८/२०२१ रोजी १७:३० वा. *लाचेचे कारण*यातील तक्रारदार यांच्या संस्थेच्या शाळांना मंजूर झालेल्या २०% अनुदानाप्रमाणे नियमित वेतन सुरू करण्याबाबत चा कार्या देश काढून देण्याकरिता आरोपी क्र.३) यांनी आरोपी क्र.१) यांचे करिता ९,००,०००/- ₹ मागणी केली त्यांनंतर दिनांक २७/०७/२०२१ रोजी आलोसे क्रमांक 1 यांची पडताळणी केली असता त्यांनी सादर कामाकरिता तडजोडी अंती 8,00,000 स्वीकारल्याचे मान्य करून लाचेच पुढील व्यवहार त्यांचे चालक आरोपी क्रमांक 2 यांचे सोबत करण्या बाबत सांगितले त्यांनंतर दिनांक 10/8/21 रोजी आलोसे क्रमांक 2 यांनी आलोसे क्रमांक 1 यांचे करीत तक्रारदार यांचे कडून 8,00,000 रूपये स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले *सापळा अधिकारी-* श्रीमती पल्लवी ढगे पाटील ए. सी. बी. ठाणे सह सापळा अधिकारी पो नि मते *सापळा पथक*पोहवा/ मोरे ,लोटेकर पोना/ शिंदे , अश्विनी राजपूत पो शी/ सुतार चापोहवा/शिंदे *मार्गदर्शन अधिकारी – *मा. डॉ. श्री.पंजाबराव उगले सो. पोलीस अधीक्षक, एसीबी ठाणे परिक्षेत्र*